सोलापूर : शहरात बकरी ईद उत्साहात साजरी | पुढारी

सोलापूर : शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  मुस्लिम धर्मामध्ये रमजान सणनंतर पवित्र सण म्हणून ओळखल्या जाणार्‍या बकरी ईद धार्मिक पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून पाऊस सुरू असला तरीदेखील मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शहरात गेल्या काही दिवसांपासून सतत संततदार पावसाची सरी सुरूच आहेत. तरीदेखील पूर्वनियोजित वेळेप्रमाणे ईद निमित्त शहरातील तीन ईदगा मैदानावर नमाज पठण करण्यात आले. सकाळी आठच्या सुमारास होटगी रोडवरील आलमगीर इदगा मैदान व पानगल हायस्कूल येथील शाही आलमगीर इदगा मैदान सकाळी नऊ वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील आदिलशाही ईदगाह मैदान या ठिकाणी सामूहिक नमाज पठण करण्यात आले.

पावसामुळे जास्तीत जास्त मुस्लिम बांधव मशिदीमध्ये नमाज पठण केले होते.
यावेळी देशात राष्ट्रीय एकात्मता कायम राहावी, जातीय सलोखा व शांतता नांदावे यासाठी विशेष ‘दुवा’ मागण्यात आली. याप्रसंगी सोलापूर शहर काझी मुक्ती काझी सय्यद अमजअली यांनी मुस्लिम बांधवांना सणाचे महत्त्व व उपस्थितांना नमाजपठणाची पद्धत समाजवून दिली.

संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. उपस्थित समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट घेत हस्तांदोलन करत ‘ईद’च्या शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त पोलिस प्रशासनाकडून ईदगाह मैदानावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच इदगाह मार्गावरील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आले होते.

Back to top button