विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भालके यांच्यासह अधिकार्‍यांवर गुन्हा | पुढारी

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भालके यांच्यासह अधिकार्‍यांवर गुन्हा

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मालकीचा पेट्रोल पंप असताना गैरव्यवहारासाठी भैरवनाथ पेट्रोलियम सरकोली येथून कारखान्यासाठी पेट्रोल व डिझेल खरेदी करुन 8 लाख 36 हजार 53 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत रोपळे येथील विलास पाटील यांनी पंढरपूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यावर नुकतीच सुनावणी झाली असून प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश खरोसे यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिला आहेत. यानुसार मंगळवारी भगिरथ भालके, बी.पी.कर्पे यांच्यासह भैरवनाथ पेट्रोलपंपाचे मालक, व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा  

नवनीत राणांचे ‘डी गँग’शी संबंध; संजय राऊत यांचा आरोप

सोलापूरच्या मुलीने गाजवली अमेरिकेतील जागतिक कराटे स्पर्धा 

सांगलीमध्ये सावकारी त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

Back to top button