मोदींची शरद पवारांना NDA त येण्याची ऑफर, पवार म्‍हणाले पराभवाच्या भीतीने… | पुढारी

मोदींची शरद पवारांना NDA त येण्याची ऑफर, पवार म्‍हणाले पराभवाच्या भीतीने...

पुणे : पुढारी ऑनलाईन पंतप्रधान नरेद्र मोदींनी आजच्या नंदुरबारच्या सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्‍हणाले, राष्‍ट्रवादी शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत यावं. पवारांनी एनडीएत NDA यावं अशी खुली ऑफर त्‍यांना दिली. या विषयी पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्नाला उत्‍तर देताना शरद पवार यांनी आमची विचारधार गांधी आणि नेहरूंची आहे. पराभवाच्या भीतीने मोदी असे बोलत आहेत. मोदींच्या वक्‍तव्यावरून ते अस्‍वस्‍थ असल्‍याचं दिसतंय असं ते म्‍हणाले. मोदींमुळे संसदीय लोकशाही धोक्‍यात आल्‍याचे म्‍हणत मोदींची भाषण ही गैरसमज निर्माण करणारी असल्‍याच टीका त्‍यांच्यावर केली.

  • पंतप्रधान नरेद्र मोदींकडून पवारांना नंदुरबारच्या सभेत एनडीएत येण्याची ऑफर

  • शरद पवार म्‍हणाले आमची विचारधार गांधी आणि नेहरूंची आहे

  • पराभवाच्या भीतीने मोदी असे बोलत आहेत : शरद पवार

  • बालबुद्धीने बोलतात म्‍हणत शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्‍युत्‍तर

आजच्या नंदुरबारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी महाराष्‍ट्रातील काही पक्ष विलिन होत असल्‍याचे म्‍हटले. राष्‍ट्रवादी शरद पवार गट देखील काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्‍याच्या बातम्‍या आल्‍या होत्‍या, त्‍यावर बोलताना मोदी यांनी शरद पवार यांनी काँग्रेससोबत जाण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत याव म्‍हणत एनडीएत NDA येण्याची भर सभेत ऑफर दिली. त्‍यावर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्‍यान शरद पवार यांनी आमची गांधी, नेहरूंची विचारधार असल्‍याचे सांगितले. तसेच लोकशाहीवर विश्वास नसणार्‍यांसोबत जाणार नसल्‍याचं स्‍पष्‍ट केलं.

पंतप्रधान कोणत्‍याही एका जातीचे अथवा धर्माचे नसतात. पंतप्रधान हे देशाचे असतात. एका समाजाबाबत वेगळी भूमिका मांडल्‍यास ऐक्‍य राहणार नाही म्‍हणत तीन टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्‍वस्‍थ झाल्‍याचं ते म्‍हणाले. मोदींनी सोरेन, केजरीवाल यांना तुरूंगात टाकलं हे योग्‍य नसल्‍याचं त्‍यांनी म्‍हटलं. यावेळी मोदी NDA सहाव्यांदा महाराष्‍ट्रात आले की, सातव्यांदा असा प्रश्न पवारांनी विचारला. दरम्‍यान ते बालबुद्धीने बोलतात म्‍हणत शरद पवारांनी अजित पवारांना प्रत्‍युत्‍तर दिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button