माळशिरस : जबरी चोरीमध्ये पावणे चार लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

माळशिरस : जबरी चोरीमध्ये पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

माळशिरस, पुढारी वृत्तसेवा : माळशिरस साठ फाटा येथील सदाशीव शंकर वाघमोडे यांच्या घरी काल रात्री जबरी चोरी होऊन तीन लाख ७६ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या बाबत अज्ञात चोरा विरुद्ध माळशिरस पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की सदाशीव वाघमोडे हे साठ फाटा येथे रानात राहतात काल रात्री सदाशीव हे घराबाहेर झोपले होते.

पत्नी व मुलगी हे घरात झोपले होते त्यानी घरात गाय विकुन आलेले एक लाख व देवीची यात्रेची गोळा झालेली वर्गणी पन्नास हजार असे दीड लाख रुपये कपाटात ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी रात्री घराची कडी काढुन घरात ठेवलेले नेकलेस, गंठण, हार, कर्णफुले, अंगठ्या असे दोन लाख सव्वीस हजाराचे दागिने व रोख पन्नास हजार असा तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. सकाळी उठल्यावर दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आल्यावर वाघमोडे यांना चोरी झाल्याचे समजले या बाबत त्यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध सदाशिव वाघमोडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास फौजदार नितीन घोळकर तपास करीत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button