सातारा : महाबळेश्वरात ‘डीजे’वर बंदी | पुढारी

सातारा : महाबळेश्वरात ‘डीजे’वर बंदी

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा :  दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या जनरेटरच्या स्फोटात जखमी झालेल्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. गुरुवारी महाबळेश्वरमध्ये रणमर्द मराठा मंडळासह स्थानिक मंडळे एकत्र येऊन त्यांनी महाबळेश्वरमध्ये डीजे बंदीचा निर्णय घेतला.

मंगळवारी रात्री महाबळेश्वर येथे दुर्गामाता विसर्जन मिरवणुकीत जनरेटरचा स्फोट होऊन सात लहान मुलांसह दोन युवक होरपळून जखमी झाले होते. या दुर्घटनेतील जखमींपैकी पाच मुलांवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर तिघांवर सातारा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या अलिना सादिक नदाफ (वय 6), समर्थ सनी सपकाळ (वय 7), शिवांश संजय ओंबळे(वय 4), ओवी पवन पॉल(वय 4 ) व संस्कृती सुनिल वाडकर (वय 4) या पाच लहान मुलांवर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर आराध्या प्रशांत भोसले (वय 4), साईशा अमित पवार (वय 4), आशितोष यशवंत मोहिते (वय 19) या तिघांवर सातारा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. अपघातात जखमी झालेल्या चिमुकल्यांवरील उपचारासाठी स्थानिक मंडळांनी एक हात मदतीचा नावाने आर्थिक मदत उभी करण्यास सुरुवात केली आहे.

Back to top button