सातारा : मजुरांच्या टेम्पोला अपघात; लहान मुलांसह अनेकजण जखमी | पुढारी

सातारा : मजुरांच्या टेम्पोला अपघात; लहान मुलांसह अनेकजण जखमी

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर बुलढाणा व अकोला भागातून मजूर घेऊन जाणाऱ्या 407 टेम्पोला अपघात झाला. टेम्पोमध्ये एकूण 40 लोक असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. रस्ते कामासाठी हे मजूर महाबळेश्वर येथे आले असल्याची माहिती मिळत असून, आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातातील जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात येणार आहे. सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे, दिपक जाधव, गायकवाड व ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदतकार्य केले.

हेही वाचा : 

Back to top button