पुढारी ऑनलाइन डेस्क : श्रद्धा वालकरचा खून करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीच्या विविध भागात टाकले होते. तिच्या प्रियकरावर तिच्या खूनाचा आरोप आहे. आरोपी आफताब पुनावाला याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याने करवतीचा वापर केला होता. श्रद्धाच्या हाडांच्या शवविच्छेदनात हे उघड झाले आहे. shradha walkar murder case
पोलीस तपासात आरोपी पूनावालाने श्रद्धाचे जिथे-जिथे तुकडे फेकले होते तिथे जाऊन गोळा केलेली हाडे ही श्रद्धाचीच होती हे डीएनए चाचणीत स्पष्ट झाले होते. त्यासाठी श्रद्धाच्या वडिलांचा आणि आफताबच्या फ्लॅटमधील रक्ताच्या नमुन्यांशी या हाडांचा डीएनए जुळला होता. shradha walkar murder case
राष्ट्रीय राजधानीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) मध्ये हाडांचे शवविच्छेदन करण्यात आले. आफताब पूनावाला याने 18 मे रोजी मेहरौली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले आणि नंतर ते अनेक दिवस शहरात फेकून दिले. shradha walkar murder case
शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरलेले करवत आणि ब्लेड कथितरित्या गुरुग्रामच्या एका भागात झुडपात फेकण्यात आले होते, तर मांस क्लीव्हर दक्षिण दिल्लीतील डस्टबिनमध्ये टाकण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. ऑक्टोबरमध्ये तिचे वडील महाराष्ट्रातील त्यांच्या गावी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हळूहळू हा गुन्हा उघडकीस आला.
हे ही वाचा :