सातारा : ओझर्डे येथे अपघात; डंपर पुलाच्या कठड्यावर अडकला | पुढारी

सातारा : ओझर्डे येथे अपघात; डंपर पुलाच्या कठड्यावर अडकला

पाचगणी ; पुढारी वृत्तसेवा : वाई तालुक्यातील ओझर्डे येथील ब्रिटिशकालीन पुलावर डंपरचा अपघात झाला. आज (शनिवार) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची नोंद पोलिस स्‍टेशन मध्ये झालेली नाही.

वाई येथून खडी घेऊन जाणारा डंपर क्रमांक MH ११ AL १३१८ हा उडतारे गावाकडे निघाला होता. या दरम्यान ओझर्डे येथील पुलावर चालकाचा ताबा सुटला आणि डंपर पुलाच्या कठड्याला धडकला. सुदैवाने डंपर पुलावरून खाली कोसळला नसल्याने कोणतीही हानी झाली नव्हती. याची नोंद पोलिस स्‍टेशनमध्ये अद्याप झालेली नाही.

हेही वाचा : 

Back to top button