नागपूर विमानतळासह देशातील ४० विमानतळे बॉम्बने उडविण्याची धमकी

File Photo
File Photo

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर विमानतळ पुन्हा एकदा बॉम्बने उडविणार असल्याच्या धमकीचा ईमेल मंगळवारी (दि.१८) एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) ला मिळाला. त्यामुळे विमानतळावर खळबळ माजली असून विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नागपूर विमानतळासह देशातील ४० विमानतळेही बॉम्बने उडविण्याची धमकी ईमेलच्या माध्यमातून विमानतळ प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एएआयला मंगळवारी (दि.१८) दुपारी १२.४५ च्या सुमारास नागपूर विमानतळ बॉम्बने उडविणार असल्याचा ईमेल आला. या मेलने विमानतळ प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली. विमानतळावर प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत असून क्यूआरटी, बीडीएस यंत्रणाही २४ तास अलर्ट झाली आहे. नागपूर विमानतळासह देशातील ४० विमानतळांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून सर्व  विमानतळांवर सिक्युरिटी अलर्ट दिला गेला आहे. दोन महिन्यात दुसऱ्यांदा असा ईमेल नागपूरसह देशभरातील इतर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news