Cristiano Ronaldo joins Al Nassr : रोनाल्डोचा युरोपला अलविदा, सौदी अरेबियाच्या क्लबशी करार, वर्षाला ८०० कोटी मिळणार | पुढारी

Cristiano Ronaldo joins Al Nassr : रोनाल्डोचा युरोपला अलविदा, सौदी अरेबियाच्या क्लबशी करार, वर्षाला ८०० कोटी मिळणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Portugal Football superstar Cristiano Ronaldo) अखेर युरोपमधील फुटबॉल क्लबला सोडचिठ्ठी दिली आहे. नवीन वर्षापासून तो आता आशियात खेळताना दिसणार आहे. नुकताच त्याने सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल नासरशी (Saudi Arabian club Al Nassr) करार केला असून तो २०२५ पर्यंत या क्लबसोबत खेळताना दिसणार आहे. क्लबने शुक्रवारी कराराची घोषणा केली. ज्यामध्ये ३७ वर्षीय रोनाल्डोला वर्षाला ८०० कोटी मिळणार आहेत. फुटबॉल इतिहासातील ही सर्वात मोठी डील मानली जात आहे. (Cristiano Ronaldo joins Al Nassr)

रोनाल्डोने सौदी अरेबियाच्या क्लब अल नासर सोबत अडीच वर्षांचा करार केला असल्याची घोषणा अल नासर क्लबने शुक्रवारी केली. अल नासरने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की पाच वेळा बॅलोन डी’ओर पुरस्कार विजेता ठरलेल्या रोनाल्डोने २०२५ पर्यंत क्लबशी करार केला आहे. रोनाल्डोने केलेला करार हा २०० दशलक्ष युरो (२१४.०४ डॉलर दशलक्ष) पेक्षा जास्त असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

“मी भाग्यवान आहे की मी युरोपियन फुटबॉलमध्ये जे काही जिंकण्याचे ठरवले होते ते सर्व मी जिंकले आणि आता आशियात माझ्या खेळाचा अनुभव शेअर करण्याची हा योग्य वेळ आहे असे मला वाटते,” असे रोनाल्डोने निवेदनात म्हटले आहे. “मी माझ्या नवीन संघातील सहकाऱ्यांसोबत सामील होण्यास उत्सुक आहे आणि त्यांच्यासोबत मिळून क्लबला यश मिळवून देईन.” असेही त्याने पुढे म्हटले आहे.

इंग्लिश क्लब मँचेस्टर युनायटेडने एका वादग्रस्त मुलाखतीनंतर रोनाल्डोचा करार रद्द केला होता. तेव्हापासून रोनाल्डो नवीन फुटबॉल क्लबच्या शोधात होता. (Cristiano Ronaldo joins Al Nassr)

हे ही वाचा :

 

Back to top button