सातारा: सज्जनगडावरील समाधी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले | पुढारी

सातारा: सज्जनगडावरील समाधी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले

परळी, पुढारी वृत्तसेवा: सातारा शहराजवळच असलेल्या व समर्थ रामदास स्वामी समाधी स्थळ असलेल्या गडावर समाधी मंदिरावर सोलर ऊर्जेचा वापर करत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्य़ामुळे मंदिर परिसर दिवाळी आधीच प्रकाशमय झाला आहे. सायंकाळच्या वेळी गडावरील समाधी मंदिर, समाधी मंदिर गाभारा विद्युत रोषणाईने अधिक खुलून दिसू लागला आहे.

गुरुवारी समर्थ रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष प्रसाद स्वामी, समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेशबुवा रामदासी, समर्थ भक्त जयेश जोशी, संजय पवार, श्रीपाद गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जयेश जोशी म्हणाले, सज्जनगडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर देशभरातून समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी समर्थ भक्त येत असतात. गडावर आल्यावर भाविकांना अध्यात्मिक शांती मिळतेच. तसेच मुक्कामी येणाऱ्या भाविकांना हा परिसर विलोभनीय वाटावा, यासाठीच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासाठी संपूर्ण जपानी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पूर्ण सोलर ऊर्जावर आधारीत असून मंदिराच्या कळसावर एलईडीच्या माध्यमाने सप्तरंगी छटा, भिंतींवर एलईडीच्या माध्यमातून रोषणाई, मंदिरातील गाभारा, घुमर, नक्षीकाम विविध छटांनी उजळून निघाले आहे. या रोषणाईने गडाच्या वैभवात वाढ होणार असल्याने आत्मिक समाधान होत आहे. याकामी विलेपार्ले (मुंबई) येथील अनिरुद्ध परांजपे यांचे विशेष सहकार्य मिळाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button