सातारा : ‘कास’वरील अनाधिकृत बांधकामावरून उदयनराजे-शिवेंद्रराजे आमने-सामने (Video) | पुढारी

सातारा : 'कास'वरील अनाधिकृत बांधकामावरून उदयनराजे-शिवेंद्रराजे आमने-सामने (Video)

सातारा, पुढारी वृत्तसेवा : साताऱ्यातील कास भागातील अनाधिकृत बांधकामावरून चांगले रान उठले आहे. आज (दि. १ सप्टें) खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांनीही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली आणि कासच्या अनाधिकृत बांधकामाबाबत चर्चा केली. एका मागून एक असे दोन्ही राजे या कासच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेताना पहायला मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण तापणार की काय अशी चर्चा सुरू आहे.

खा. उदयनराजे यांनी कासचा निसर्ग वाचला पाहिजे आणि स्थानिकांची बांधकामे नियमित करून द्यावी, मात्र मोठमोठ्या धनिकांनी केलेली बांधकामे काढली जावी, असा पवित्रा घेतला आहे. तर आ. शिवेंद्रराजे यांनी मात्र कास भागातील सर्व बांधकामे सरसकट नियमित करून द्यावी, अशी भूमिका घेतली आहे. प्रशासन जर जेसीबी घेवून आले तर आम्ही त्याला विरोध करणार असल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले आहे. घर पडायला आले तर प्रशासनाकडे आम्ही काय बघत बसणार नाही, असं ही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं. एकूणच या दोन्ही राजांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कास बाबत प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button