कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर कार पलटी, चारजण जखमी | पुढारी

कराड : पुणे-बंगळूर महामार्गावर कार पलटी, चारजण जखमी

कराड, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर महामार्गावर कराडजवळ गोटे गावच्या हद्दीत भरधाव वेगातील माेटारीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने वॅगन आर कार महामार्गावरच पलटी झाली. बुधवार (दि 31) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास  हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघातात दोन्ही कारमधील चारजण किरकोळ जखमी झाले. जखमींना तात्‍काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा बाजूकडून कराड बाजूकडे वॅगन आर कार येत होती. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येत असलेल्या एसयूव्‍ही वेन्यूने गोटे गावच्या हद्दीत कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. कार दुभाजकाला धडकून महामार्गावरच पलटी झाली.  दोन्ही वाहनांतील चारजण किरकोळ जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे विक्रम सावंत, विशाल होवाळ यांच्यासह कराड शहर पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे कर्मचा-यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. स्‍थानिकांनी जखमींना उपचारासाठी तात्‍काळ रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा 

Back to top button