हिंगोली : हातभट्टी दारू विक्रेत्यांवर छापा; सहा जणांविरुद्ध कारवाई | पुढारी

हिंगोली : हातभट्टी दारू विक्रेत्यांवर छापा; सहा जणांविरुद्ध कारवाई

आखाडा-बाळापूर (हिंगोली), पुढारी वृत्तसेवा :  आखाडा बाळापूर येथील पोलिसांनी रामेश्वर तांडा येथे एकाच वेळी विविध दारू गाळप विक्रेत्यावर छापे मारून सहा जणांविराेधात कारवाई केली. 45 हजार रुपये  व दीडशे लीटर गावठी दारू तसेच हजारो रुपयांचे मोह फुलांचे रसायन जप्त केले.

सध्या गणेश उत्सवाचे आगमन व विविध सणांची सुरुवात झाली असून, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. रामेश्वर तांडा तालुका कळमनुरी येथे दारू गाळप विक्रेते  महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार घडलेल्‍या आहेत. अवैध गावठी दारू गाळप करणारे व विक्री करणारे राजू उत्तम जाधव, बाळू उत्तम जाधव, उषाबाई भ्. गणेश जाधव, बाळू गणपत जाधव, कैलास छोटू जाधव, लखन अशोक पवार सर्व राहणार रामेश्वर तांडा. यांच्याविराेधात कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button