सातार्‍यात प्रारुप मतदार यादीवर 132 हरकती | पुढारी

सातार्‍यात प्रारुप मतदार यादीवर 132 हरकती

सातारा : सातारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये 132 हरकती प्राप्‍त झाल्या आहेत. 1 जुलैपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येणार आहेत.

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. शहरातून 132 हरकती प्राप्‍त झाल्या आहेत. या हरकती प्रामुख्याने प्रभाग सीमेवरील आहेत. एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागातील मतदार यादीत नाव समाविष्ट झाल्याने हरकती वाढल्या आहेत. प्राप्‍त झालेल्या हरकतींची शहानिशा करुन अंतिम मतदार यादी समाविष्ट जाहीर करण्यात येणार आहे. 5 जुलैपर्यंत सुचना व हरकती दाखल करता येणार आहेत. सातारा शहरात 1 लाख 42 हजार 5 मतदार असून शहराची लोकसंख्या 1 लाख 80 हजार 568 इतकी आहे. एका प्रभागात सुमारे 5 ते 6 हजार इतकी मतदारसंख्या आहे.

Back to top button