फलटण तालुक्यातील 31 शाळा शंभर नंबरी | पुढारी

फलटण तालुक्यातील 31 शाळा शंभर नंबरी

फलटण; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षा निकालात फलटण तालुक्यातील 59 शाळांपैकी 31 शाळा शंभर नंबरी ठरल्या आहेत. तालुक्याचा एकूण निकाल 97.7 टक्के लागला असून 1281 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे.

दहावी बोर्ड परीक्षेसाठी फलटण तालुक्यात 4278 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 4153 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 1708 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली असून 977 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली आहे. तसेच 187 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी देण्यात आली आहे. तालुक्यातील 59 शाळांपैकी 31 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल मिडियम स्कूल, निंबळक, सरदार वल्लभभाई हायस्कूल, साखरवाडी, छत्रपती शिवाजी हायस्कूल वाखरी, जानाई हायस्कूल राजाळे, सरस्वती माध्यमिक विद्यालय बिबी, हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी, हिंगणगाव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव, तरडफ माध्यमिक विद्यालय तरडफ, न्यू इंग्लिश स्कूल निंभोरे, मॉडर्न हायस्कूल बरड, वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर, मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी, श्रीमती प्रमिलाताई चव्हाण हायस्कूल फलटण, शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल, सिद्धेश्वर हायस्कूल पिंपरद, ढवळ हायस्कूल ढवळ, सालपे माध्यमिक विद्यालय सालपे, श्री संत डी.एम. विद्यालय नांदल, सरलष्कर खर्डेकर विद्यालय हणमंतवाडी, ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय फडतरवाडी, आदर्की माध्यमिक विद्यालय आदर्की खुर्द, शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी, वडले माध्यमिक विद्यालय वडले, वाजेगाव माध्यमिक विद्यालय वाजेगाव, पाचपांडव माध्यमिक विद्यालय अलगुलेवाडी, श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा खराडेवाडी, निरगुडी हायस्कूल निरगुडी, अ‍ॅम्बिशन इंग्लिश मीडियम स्कूल, आदर्की बु॥, ब्रिलियंट अ‍ॅकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल फलटण, बीजे इंग्लिश मीडियम स्कूल खामगाव, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल फलटण या शाळांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दरम्यान, दुधेभावी येथे दुधेश्वर माध्यमिक विद्यालयाचे तीन विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी बसले होते. हे तीनही विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

Back to top button