सांगली : राजापुरी हळदीला सांगलीत उच्चांकी दर | पुढारी

सांगली : राजापुरी हळदीला सांगलीत उच्चांकी दर

सांगली, पुढारी वृत्तसेवा: येथील मार्केट यार्डात बुधवारी झालेल्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला 18 हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. दरम्यान, भाव चांगला मिळाल्याने शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त आहे.

मार्केट यार्डात हळदीची आवक – जावक चांगली आहे. वाळवा तालुक्यातील बावची येथील विजयकुमार चव्हाण या शेतकर्‍याच्या हळदीला बुधवारी झालेल्या सौद्यात क्विंटलला 18 हजार रुपये दर मिळाला. हळद सौद्यामध्ये क्विंटलला कमीत कमी 6 हजार आणि जास्तीत-जास्त 18 हजार व सरासरी 12 हजार रुपये असा दर मिळाला आहे.

येथील मार्केट यार्डात हळद खरेदीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत आहेत. परिणामी हळदीस चांगला दर मिळतो आहे. यामुळे शेतकर्‍यांना चार पैसे मिळू शकणार आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकर्‍यांनी आपली हळद जास्तीत- जास्त विक्रीसाठी बाजार समितीमध्ये घेऊन यावे, असे आवाहन सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.

दरम्यान, चालू हळद आणि बेदाणा या शेतीमालावर शासनाची तारण कर्ज योजनाही सुरू आहे, त्यांचा लाभ घ्यावा, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button