Raj Thackeray : राज ठाकरे हाजीर हो ! परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट

Raj Thackeray : राज ठाकरे हाजीर हो ! परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट

परळी वैजनाथ ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिला आहे. (Raj Thackeray)

थोडक्यात वृत्त असे की दिनांक २२-१०- २००८ रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक करण्यात आले. परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. दरम्यान सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक केली होती.

Raj Thackeray : मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बसचे समोरील काच फोडुन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यास राज ठाकरे यांनी चिथावणी दिली होती.

याविरोधात परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 208/2008 अन्वये गुन्हा कलम 143, 427, 336, 109 भारतीय दंडसंहितेनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीसांनी तपास करुन राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरण जुने असुन राज ठाकरे व त्यांचे कार्यकर्त्यांनी जामीन करुनही न्यायालयात सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ.एम.एम.मोरे/पावडे यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news