सांगलीत ‘विशाल’ मेळावा; दादाप्रेमी भरउन्हात एकवटले | पुढारी

सांगलीत ‘विशाल’ मेळावा; दादाप्रेमी भरउन्हात एकवटले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे विशाल पाटील यांच्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे संतप्त समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते मंगळवारी रस्त्यावर उतरले. रखरखत्या उन्हातही प्रचार फेरी व मेळाव्यासाठी जिल्हाभरातून हजारो लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. जनतेच्या स्वाभिमानासाठी विशाल पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

येथील गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली. विशाल पाटील म्हणाले, मलाच एबी फॉर्म निश्चित मिळणार. आता निर्णय त्यांच्यावर ठेवला आहे. त्यांनी माघार घ्यायची आहे. आम्ही कामाला लागलो आहोत. दोन काँग्रेसकडून आणि एक अपक्ष अर्ज आतापर्यंत भरला आहे. आणखी एक अर्ज भरणार आहे. महाविकास आघाडीने सांगलीतील उमेदवारी बदलावी.

हे बंड माझे नव्हे, काँग्रेसचे : विशाल पाटील

सांगलीची जनता ही अन्याय सहन न करणारी जनता आहे. इथल्या रक्तातच बंड करण्याची वृत्ती आहे. हे बंड माझ्या एकट्याचे नाही. हे काँग्रेस पक्षाचे व जनतेचे बंड आहे, असे विशाल पाटील म्हणाले.

Back to top button