सांगली : भाजपची लक्षवेधी बाजी; बिळूर, कोनबगी, गुलगुजनाळ, ग्रामपंचायतवर वर्चस्व | पुढारी

सांगली : भाजपची लक्षवेधी बाजी; बिळूर, कोनबगी, गुलगुजनाळ, ग्रामपंचायतवर वर्चस्व

जत : पुढारी वृत्तसेवा – राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या बिळूर, कोत्येबोबलाद या ग्रामपंचायत वर निर्विवाद वर्चस्व भाजपने मिळवले आहे. त्याचबरोबर कोनबगी, गुलगुजनाळ, खिलारवाडी या ग्रामपंचायत वर भाजपनेच बाजी मारली आहे. तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निकाल दुपारी एक वाजता येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या निकालाने काँग्रेसला धक्का मानला जात आहे. विद्यमान आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बॅकफूटावर केल्याचे दिसून आले. तर भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह नेतृत्वाखाली ५ ग्रामपंचायतीने विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या – 

जत तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोंत्येबोबलाद ग्रामपंचायतवर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांचे मुळगाव असलेल्या होम पिचवर विजय मिळवला आहे. कोंत्येबोबलाद येथे सर्वसाधारण स्त्री राखीव जागेवर सरपंचपदी राणी मुरलीधर जगताप (११६१) ह्या निवडून आले आहेत तर काँग्रेसच्या रूपाली रमेश माळी (७०४) प्रभाग एक मधून गडदे आमसिद्ध भिमगोंडा, पटेल साहेबलाल, प्रभाग दोन मधून सर्वसाधारण आरक्षित जागेवर मचंद अशोक साबू , सरकार प्रेमा तुकाराम हे निवडून आले आहेत तसेच प्रभाग तीन मधून सावंत गुलाबराव रामचंद्र, जगताप शैला बाळासो, पाटील जिजाबाई केंचराव हे उमेदवार विजयी झाले आहेत. चार मधील लक्षवेधी लढतीत जगताप नारायण वामन, वाघमारे कोतेव्वा जयापा, शिरसाड मलवा मल्लापा हे उमेदवार विजयी झाले आहेत.

Back to top button