सांगली : बुधगाव स्मशानभूमीत पुन्हा रात्रीस खेळ चाले | पुढारी

सांगली : बुधगाव स्मशानभूमीत पुन्हा रात्रीस खेळ चाले

बुधगाव; पुढारी वृत्तसेवा :  सांगली शहरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या बुधगाव गावात स्मशानभूमीत काळी जादू, अघोरी प्रकार करण्यात येत आहेत. करणी, भानामतीच्या घटनांमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. रात्री बारा वाजता काही मांत्रिक येऊन असे प्रकार करतात. गावकर्‍यांच्या भावनेशी एकप्रकारे खेळ सुरू असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोणाविरोधी कायद्यालाच आव्हान देण्यात येत आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

गावातून कुपवाडकडे जाणार्‍या रस्त्याकडेला स्मशानभूमी आहे. येथे बर्‍याच दिवसांपासून काही गैरप्रकार होत आहेत. विशेष करून अमावास्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री बाहेरगावच्या काही लोकांकडून अघोरी प्रकार केले जातात. जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कठोर अंमलबजावणी होत नसल्याने अशा घटना वाढताना दिसत आहेत. गुरुवारी सकाळी रक्षाविसर्जन करण्यासाठी गावातील लोक स्मशानभूमीत गेल्यानंतर अघोरी प्रकार पाहून अनेकांची भीतीने गाळण उडाली. वारंवार होणार्‍या भूतबाधा, करणी, भानामती या प्रकारांचा प्रतिबंध करावा अशी मागणी होत आहे.

Back to top button