वेगळा विचार करा; करिअरच्या अनेक वाटा खुल्या | पुढारी

वेगळा विचार करा; करिअरच्या अनेक वाटा खुल्या

सांगली, पुढारी वृत्तसेवा : मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी पालक प्रयत्न करतात; पण चांगले शिक्षण म्हणजे काय ते समजून घ्या. ज्या शिक्षणाची मार्केेटला गरज आहे ते घेत त्याला कौशल्याची जोड दिली, तरच चांगले करिअर घडू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

दैनिक ‘पुढारी’ आयोजित आणि जेएसपीएम युनिव्हर्सिटी प्रायोजित ‘करिअरची दिशा आणि यशाचा राजमार्ग’ या विषयावर 11 वी, 12 वी, पदवीपूर्व आणि पदवीधर विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी आणि पालकांनी सायन्स, मॅनेजमेंट क्षेत्रातील नव्या संधींबाबत अनेक प्रश्न विचारले. जेएसपीएम युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसचे संचालक डॉ. महेश बुरांडे, जेएसपीएम युनिव्हर्सिटीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. संतोषराव बोर्डे, जेएसपीएम युनिव्हर्सिटीच्या ह्युमॅनिटी अँड सोशल सायन्सेस डीन डॉ. करुणा गोळे यांनी प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले.

अनेक संधी; विश्व खुले

पारंपरिक कोर्सेस करण्यापेक्षा सार्‍याच क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. लिबरल आर्टस्, फॉरेन्सिक सायन्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, अ‍ॅनिमेशन, ई -मोबिलिटी यासारख्या नव्या करिअर क्षेत्रातून यशाचा मार्ग निवडता येतो.

पदवीसोबत अनुभव देणारी युनिव्हर्सिटी : डॉ. बोर्डे

जेएसपीएम युनिव्हर्सिटी ही पदवीसोबत विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष कामांचा अनुभव देणारी युनिव्हर्सिटी आहे. अ‍ॅटोनॉन इन्स्टिट्यूट आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यात फरक आहे. इंजिनिअरिंगमध्ये सध्याचे आणि भविष्यातील ट्रेंडस् काय आहेत, चांगला इंजिनिअर होण्यासाठी कोणती कौशल्ये हवीत, नॉन आयटी आणि आयटी क्षेत्रात कोणत्या संधी आहेत, याचा विचार जेएसपीएम युनिव्हर्सिटीने केला आहे. करिअरची दिशा आणि यशाचा मार्ग सुकर होण्यास मदत होईल, अशी खात्री डॉ. बोर्डे यांनी व्यक्त केली.

लिबरल बीए महत्त्वाची दिशा : डॉ. गोळे

पारंपरिक बीएची पदवी घेण्यापेक्षा लिबरल बीए ही दिशा महत्त्वाची आणि करिअर घडवणारी आहे. लिबरल आर्टस्मध्ये कम्युनिकेशन स्किल्स घडवले जाते. विविध क्षेत्रांमध्ये त्यासाठी आज खूप संधी आहेत, असे सांगून त्यांनी लिबरल आर्टबाबत माहिती दिली.

ग्लोबल डिग्री घ्या : डॉ. बुरांडे

व्हिजन नसेल, तर येणार्‍या काळात स्वत:ला सिद्ध करून पुढे जाणे अवघड असते. फार्मसीमधील करिअरच्या 15 हूनही जास्त संधी आहेत. फॉरेन्सिक सायन्समध्येही अनेक संधी उपलब्ध आहेत. एमबीए फार्मा किंवा एमबीए लाईफ सायन्ससारखे नवे कोर्स केले, तर करिअर घडू शकते. यासाठी जेएसपीएम युनिव्हर्सिटीमध्ये 30 टक्के स्टाफ हा इंडस्ट्रीतून, तर 10 टक्के स्टाफ हा परदेशी विद्यापीठातून घेण्यात आला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांना ग्लोबल डिग्री मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

जेएसपीएमचे प्रोग्रॅम डायरेक्टर आनंद यांनी युनिव्हर्सिटीबाबत माहिती दिली. दैनिक ‘पुढारी’च्या सांगली आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक युवराज पानारी यांनी स्वागत केले. कार्यक्रमास इव्हेंट मॅनेजर पुणे बाळासाहेब नागरगोजे, जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रश्नांना समाधानकारक उत्तरे

पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात करिअर, शिक्षण, संधी याबाबत संभ्रमावस्था आहे. यावेळी त्यांनी मनातील अनेक शंका विचारल्या. मेकॅट्रॉनिक्स, मरिन सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, परदेशातील वैद्यकीय शिक्षण, फार्माकॉलॉजी, लिबरल आर्टस्, मास कम्युनिकेशन या क्षेत्रातील संधी, त्याचे भवितव्य याबाबत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

Back to top button