जिल्हा बँक : अनेेक दिग्गजांचे शक्‍तिप्रदर्शनाने अर्ज दाखल | पुढारी

जिल्हा बँक : अनेेक दिग्गजांचे शक्‍तिप्रदर्शनाने अर्ज दाखल

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. शक्‍तिप्रदर्शनाने अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले. एकूण 253 अर्ज आले आहेत. शुक्रवारी दि. 22 रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी सोमवारी आहे.

आज बहुसंख्य बड्या इच्छुकांनी अर्ज भरले. 91 अर्जांची विक्री झाली.आजअखेर 769 अर्जांची विक्री झाली आहे. आज 204 जणांनी उमेदवारी अर्ज विविध गटांतून दाखल गेले. उद्या मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार अनिलराव बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, अजितराव घोरपडे, बाबासाहेब मुळीक, महेंद्र लाड, सी. बी. पाटील, प्रा. डॉ. सिंकदर जमादार, चंद्रकांत हाक्के, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, राहुल महाडिक, डी.के. पाटील, देवराज पाटील, वैभव शिंदे, वैभव पाटील, शशिकांत देठे, सुनील पाटील, अर्जुन पाटील, सुरेश पाटील, रवींद्र बर्डे, किरण लाड, पोपटराव संकपाळ, सत्यजीत देशमुख, रणधीर नाईक, सत्यजित नाईक, तम्मणगौडा रवी-पाटील, अनिता सगरे, चिमण डांगे, सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे, मंगल जमदाडे, जयश्री मदन पाटील या दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

जयश्री तानाजी पाटील, आकाराम पाटील, संगीता खोत, वैशाली मोहिते, मालन मोहिते, पुष्पलता उगळे, मीनाक्षी आक्की, मन्सूर खतीब, मुनीर जांभळीकर, इद्रीस नायकवडी, चन्नाप्पा होर्तीकर, विष्णूू माने, अनिल शेनगुसे, उमेश पाटील, बजरंग पाटील यांनीही  जिल्हा बँक निवडणुकसाठी अर्ज दाखल केले आहेत.

इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांची उमेदवारी अंतिम करताना दमछाक होणार आहे. छाननीनंतर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Back to top button