विटा : ‘गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने यशवंत शुगर ची तयारी सुरू’ | पुढारी

विटा : 'गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने यशवंत शुगर ची तयारी सुरू'

विटा : पुढारी वृत्तसेवा सन २०२३-२४ चा गळीत हंगाम सुरू करण्या च्या दृष्टीने यशवंत शुगर कारखान्याने सर्व तयारी सुरू केली आहे, अशी माहिती भारती शुगरचे अध्यक्ष ऋषिकेश महेंद्र लाड यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील नागेवाडी (ता.खानापूर) येथील यशवंत साखर कारखाना कार्यस्थळावर सन २०२३-२४ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या कराराचा प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीला भारती शुगरचे अध्यक्ष ऋषिकेश महेंद्र लाड व उपस्थित तोडणी वाहतूक कंत्राटदार, वाहन मालक यांच्या हस्ते करारपत्रांचे पूजन करण्यात आले. यशवंत शुगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पहिल्या पाच करार करण्याचा मान मिळालेल्या वाहन मालकांचा ऋषिकेश लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी दिघंची, आटपाडी, जत, मंगळवेढा, खानापूर व तासगाव तालुक्यातील अनेक तोडणी वाहतूक कंत्राटदार व वाहन मालक उपस्थित होते. यावेळी ऋषिकेश लाड म्हणाले, येणारा गळीत हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुरू केली असून, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या ऊसाच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झाले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी कारखान्याच्या शेती विभागाकडे कराव्यात. आपण ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी सक्षम तोडणी यंत्रणा उभी करणार असून परिसरातील ऊस तोडणी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या वाहन मालकांनी आपले करार कारखान्याकडे करावेत असे आवाहनही लाड यांनी केले.

यावेळी श्रीपती शुगरचे शेती अधिकारी दरीगौडा, प्रशासकीय अधिकारी प्रसाद गोकावे, फायनान्स मॅनेजर आनंद मोहोळकर, पर्यावरण व्यवस्थापक अशोक सूर्यवंशी, एच आर मॅनेजर रणजित जाधव, कृषी अधिकारी ओंकार पाटील, उत्तम ढेरे, सुर्यकांत पाटील, संतोष बाबर, सौ.सारिका माने, महेश ढाणे, सर्जेराव वावरे यांच्यासह परिसरातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button