Monsoon Update | यंदा मान्सून 'सामान्य'च; 'या' दिवशी केरळमध्ये होणार दाखल, IMD ची माहिती | पुढारी

Monsoon Update | यंदा मान्सून 'सामान्य'च; 'या' दिवशी केरळमध्ये होणार दाखल, IMD ची माहिती

पुढारी ऑनलाईन : यंदा जून ते सप्टेंबर या महिन्यात सरासरी ९६ टक्के पाऊस पडणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून सामान्यच (Monsoon Update)  राहणार आहे. त्यामुळे यंदा देशभरात तुलनेने कमी पाऊस पडणार आहे. तसेच जून महिन्यात देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मान्सून ४ जूनच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित आहे. १ जूनपूर्वी मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

हवामान विभागाकडून मान्सून (Monsoon Update) संदर्भात दुसरा अंदाज आज (दि.२६) जाहीर करण्यात आला. यामध्ये मान्सून संदर्भात काही महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

Monsoon Update: ७ जून रोजी तळकोकणात दाखल

अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वार्‍यांचा वेग वाढल्याने केरळमध्ये १ जून, तर महाराष्ट्रात तळकोकणात ७ जून रोजी मान्सून येऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या मान्सून बंगालच्या उपसागरात असून, तो वेगाने प्रगती करीत आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात निर्माण झाल्याने त्या भागात पाऊस सुरू झाला आहे. तसेच महाराष्ट्र ते तामिळनाडू भागावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात बाष्पयुक्त वार्‍यांचा प्रभाव वाढल्याने हा बदल (Monsoon Update)  झाला आहे, असे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button