गुड न्यूज ! 'अल निनो'ला घाबरण्याचे कारण नाही; यंदा जूनमध्ये पडणार भरपूर पाऊस | पुढारी

गुड न्यूज ! 'अल निनो'ला घाबरण्याचे कारण नाही; यंदा जूनमध्ये पडणार भरपूर पाऊस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जूनमध्ये देशात 164 मिमी पाऊस पडेल. भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने ‘अल निनो’चा धोका नाही, तसेच केरळात मान्सून लवकर येऊ शकतो अशी माहिती दिल्ली येथील हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी एस पै यांनी दिली. हवामान विभागाने शुक्रवारी ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली त्यात डॉ. डी. एस. पै यांनी विस्ताराने माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘आल निनो’ मान्सूनचे आगमन झाल्यावर सकारात्मक होण्याची 70 टक्के शक्यता आहे. मात्र भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) मान्सूनला अनुकूल असल्याने जूनमध्ये पाऊस चांगला (164 मिलीमीटर) होईल.

मान्सून लवकर येऊ शकतो

डॉ. पै म्हणाले, मान्सून सध्या निकोबार बेटावर आहे. आमच्या अंदाजाप्रमाणे तो 4 जूनला अपेक्षित आहे. सकारात्मक वातावरण तयार झाले तर तो लवकर येण्याची शक्यता आहे.

Back to top button