जतमधील कोणीकोनूरमध्ये माजी सैनिकांने केला हवेत गोळीबार | पुढारी

जतमधील कोणीकोनूरमध्ये माजी सैनिकांने केला हवेत गोळीबार

जत, पुढारी वृत्तसेवा

कोणीकोनूर ( ता. जत ) येथे एका माजी सैनिकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. हवेत गोळीबार केलेल्या माजी सैनिकाचे गंगाराम जयराम लमाण (चव्हाण) वय. ३९ असे नाव आहे. याप्रकरणी उमदी पोलिसात नोंद झाली आहे. लमाण यास पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना जामीन मिळाला आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगाराम लमाण हे माजी सैनिक असून त्यांचे मूळ गाव कोनिकोनूर आहे. त्यांच्याकडे परवानाधारक बंदूक आहे. लमाण यांनी गुरुवारी दुपारी स्वतःच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेत बंदुकीने हवेत तीन फैरी झाडल्या. या प्रकाराने गावातील वातावरण भयभीत झाले होते. पोलिसांनी लमाण यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे व लमाण यांच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली आहे व घटनास्थळावरील तीन पुंगळ्या जप्त केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा शस्त्रबंदी आदेश असताना परवानाधारक पिस्तूल लमाण यांनी अनाधिकृतपणे शस्त्राचा वापर केला आहे .अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button