

मुंबईतील क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या धाडीत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला अटक केल्यानंतर ड्रग्जप्रकरणी आता शाहरूख खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठविले आहे. त्याला एनसीबीने चौकशीसाठी बोलविले असून याप्रकरणाचा गुंता वाढत आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रथम भाजपचा एक पदाधिकारी आणि खासगी व्यक्ती या कारवाईत संशयितांना पकडून नेतानाचा व्हिडिओ दाखवून कारवाई संशयास्पद असल्याचे सांगितले. तर आज केलेल्या आरोपात या कारवाईदरम्यान एनसीबीने भाजपशी संबधित काही लोकांना सोडून दिल्याचे मलिक यांनी सांगितले.
क्रूझवर पार्टीत सहभागी झालेल्या आर्यन खान, मूनमून धमेचासही अन्य लोकांचा जामीन नाकारल्याने त्यांची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. मात्र, आता एनसीबीने शाहरूख खानच्या वाहनचालकाला समन्स धाडत चौकशीसाठी बोलविले आहे. शुक्रवारी (ता. ८) आर्यन खानचा जामीन नाकारला होता. या दिवशी गौर खान हिचा वाढदिवस होता. त्याला जामीन मिळेल असे वाटत होते. मात्र, त्याची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्याचा मित्र अरबाज खान, मॉडेल मूनमून धमेचा हिच्यासहीत आठ लोकांना अटक केली होती.
मात्र, ही कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी लावला होता. एनसीबीच्या कारवाईत भाजपचे कार्यकर्ते काय करत होते. एनसीबी खासगी व्यक्तींचा सहभाग का घेते, असे सवाल केले होते.
क्रुझ शिपवरील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan case) जामीन अर्ज मुंबई कोर्टाने फेटाळला. कोर्टाने Aryan Khan ला पुढील १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एनसीबीचे अधिकारी आर्यनला कोर्टातील माडीवरून खाली घेऊन येतात पाहून (Aryan Khan case) गौरी खानला अश्रू अनावर झाले. गाडीमध्ये गौरी खान डोक्याला हात लावून चिंतेत बसलेली दिसली. हा प्रसंग माध्यमांनी कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. क्रूझवर एकूण १० लोकांवर कारवाई करण्यात आली. पण त्यातील दोन लोकांना सोडून देण्यात आलं. त्यात एका हाय प्रोफाइल भाजप नेत्याच्या मेव्हण्याचा समावेश होता. त्याला सोडून देण्यात आलं, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा :