सांगली : ‘पुढारी अ‍ॅग्रीपंढरी’ला कंपन्यांचा प्रचंड प्रतिसाद | पुढारी

सांगली : ‘पुढारी अ‍ॅग्रीपंढरी’ला कंपन्यांचा प्रचंड प्रतिसाद

सांगली : पुढारी वृत्तसेवा : पुढारी मध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुढारी अ‍ॅग्रीपंढरी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन’ 3 ते 7 मार्च दरम्यान जिल्हा कृषी विभाग मैदान, जिल्हाधिकारी कार्यालयामागे, विजयनगर सांगली येथे आयोजित करण्यात येणार आहे. ऑर्बिट क्रॉप सायन्सेस हे या प्रदर्शनाचे प्रायोजक व सहप्रायोजक रौनिक स्मार्ट होम अप्लायन्सेस हे आहेत. यंदा प्रदर्शनाचे तिसरे वर्ष आहे. विविध नामांकित कृषी तंत्र कंपनी आणि शेतकरी यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून दै. ‘पुढारी’ आपली जबाबदारी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पार पाडत आहे.

200 कंपन्या सांगलीत

प्रदर्शनात 200 हून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये खते, बी-बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय उत्पादने, सोलर पंप, मोटार पंप, ट्रॅक्टर – अवजारे यांची प्रात्यक्षिके, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, धान्य निवडक यंत्रे, अत्याधुनिक पीक अंतर्गत अवजारे, मल्चिंग पेपर, शेडनेट, पाइप अशा विविध प्रकारचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत.

40 एकरहूनही भव्य-दिव्य मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील 30 हून अधिक पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना पाहायला मिळणार आहे. भरघोस उत्पादन देणारी विकसीत केलेली सर्व पिके पाहण्यासाठी तयार असणार आहेत. भाजीपाला तसेच फूलवर्गीय पिकांचाही यामध्ये समावेश आहे.

प्रात्यक्षिक प्रदर्शनाची ‘पुढारी’ची परंपरा

हे फक्त प्रदर्शन नाही तर देश-विदेशातील 30 हून पिकांसह प्रदर्शन घेऊन ‘पुढारी’ने कृषी क्षेत्रात नवी क्रांती केली आहे. यामधून शेतकर्‍यांना पिके कोणती घ्यावीत, खते कोणती, बियाणे आणि पिकांच्या जाती कोणत्या, त्याचे उत्पादन कसे जास्त येऊ शकते हे ‘पुढारी’च्या माध्यमातून शेतकर्‍यांना समजणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शेतकरी वर्गाला प्रदर्शन पाहण्याची उत्सुकता असणार आहे.

या प्रदर्शनामध्ये पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन, कुक्कुटपालन याचेही प्रदर्शन भरवले जाणार आहे. मत्स्यपालनमध्ये पाच प्रकारच्या प्रजाती प्रदर्शनात पाहता येणार आहेत. कुक्कुटपालनमध्ये हॅचरीजपासून ते पोल्ट्री व्यवसायापर्यंत सर्व ती माहिती मिळणार आहे.

डॉग व कॅट शोचे आयोजन

या प्रदर्शनामध्ये डॉग आणि कॅट शो चेही आयोजन करण्यात आले आहे. या शो मध्ये दि. 5 रोजी कॅट शो तर दि. 6 रोजी डॉग शो होणार आहे. कॅट शो मध्ये तीन लाख रुपयांपर्यंतचे मांजर आणि डॉग शोमध्ये बारा लाख रुपयांचा थेट जर्मनीतून आणलेला जर्मन शेफर्ड पहायला मिळणार आहे. यासह अनेक चॅम्पीयन डॉग या शो मध्ये सहभागी होणार आहेत. डॉग आणि कॅटस्च्या वेगवेगळ्या स्पर्धा होणार असून सांगलीकरांना वेगवेगळ्या जाती पहायला मिळणार आहेत, या शो च्या बुकिंगसाठी संपर्क
स्वप्निल ( 9503679108).

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : राहुल 9850844271, बाळासाहेब 9850556009

Back to top button