सांगली : करंजे ते भिवघाट रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर | पुढारी

सांगली : करंजे ते भिवघाट रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

विटा; पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघात दोन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री उशिरा करंजे गावातील हद्दीत खापरगादे फाटा येथील पुलावर घडला. जखमींना रुग्णालयात दाखल केले असता गुरुवारी (दि. २४) यातील गंभीर जखमी बाळासाहेब शिवाजी माने (रा. करंजे, ता. खानापूर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहन चालक हिंदुराव शशिकांत सूर्यवंशी (रा. करंजे, ता. खानापूर) याच्या विरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, करंजे ते भिवघाट रस्त्यावरील करंजे गावचे हद्दीत खापरगादे फाटा येथील पुलावर बुधवारी रात्री उशिरा हिंदुराव सूर्यवंशी हा भरधाव वेगात व निष्काळजीपणे कार (क्र.एम.एच .१४ डीटी ०२७६) चालवत आला. यावेळी त्याने पुलावरुन जाणाऱ्या दोघांना मागून धडक दिली. यात घोडके आणि माने दोघेही गंभीर जखमी झाले. यातील बाळासाहेब माने यांचा गुरुवारी मृत्यू झाला. तसेच या धडकेत वीज वितरण कंपनीच्या खांबाचेही नुकसान झाले आहे. बाळासाहेब माने यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मरणास आणि वीज वितरण कंपनीचा खांबाच्या नुकसानीस कारणभूत ठरला म्हणून हिंदुराव सूर्यवंशी यांच्या विरोधात विटा पोलिसात भादविस कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ एम. व्ही. अॅक्ट कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

अधिक वाचा :

Back to top button