सांगली : बनावट कागदपत्रांद्वारे जमीन नावावर केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : बनावट कागदपत्रांद्वारे जमीन नावावर केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

जत, पुढारी वृत्तसेवा : धुळकरवाडी (ता.जत) येथे एका मयत व्यक्तीचे बनावट आधार कार्ड व कागदपत्रे सादर करून त्यांच्या नावावरची जमीन भाऊसाहेब करे यांच्या नावावर केल्याप्रकरणी सहा जणांवर उमदी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद मंडळ अधिकारी सुभाष रामचंद्र कोळी यांनी दिली आहे.

तत्कालीन प्रांताधिकारी यांना खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी बबन नारायण करे, (रा. धुळकरवाडी) आकाश संभाजी बंडगर (रा.रामपूर) विलास मनगेणी मासाळ (रा.दरीबडची) आकाश रमेश मिसाळ (रा.जत) यल्लाप्पा यशवंत कांबळे व भाऊसाहेब नारायण करे (रा. धुळकरवाडी ) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी धूळकरवाडी येथील लक्ष्मण नारायण चव्हाण हे १५ मे १९७५ रोजी मयत झाले होते. परंतु तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे खोटी कागदपत्र मार्च २०१८ ते २०२२ दरम्यान सादर केली. या खोट्या कागदपत्राच्या आधारे भाऊसाहेब नारायण खरे यांच्या नावावर ही जमीन करण्यात आली. मयत व्यक्ती असताना सुद्धा खोटे कागदपत्र सादर करून साक्षीदार म्हणून सहभागी असलेल्या व्यक्ती वर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button