सांगली : कस्तुरीतर्फे दिवाळीनिमित्त फराळ कार्यशाळा; सभासदांसाठी प्रवेश मोफत | पुढारी

सांगली : कस्तुरीतर्फे दिवाळीनिमित्त फराळ कार्यशाळा; सभासदांसाठी प्रवेश मोफत

सांगली;  पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी कस्तुरीतर्फे सभासदांसाठी फराळ पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात दिवाळीनिमित्त फराळाचे खास पदार्थ आणि ते बनविण्यासाठीच्या खुमासदार टिप्स् महिलांना मिळणार आहेत. बुधवारी, दि. 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.00 वाजता ही कार्यशाळा रजपूत शैक्षणिक संकुल, व्हाईट हाऊस, त्रिकोणी बागेजवळ, सांगली येथे होणार आहे.

कार्यशाळेत काय शिकाल?

खमंग भाजणी व काटेरी चकली, नमकीनचे विविध प्रकार, चंपाकली, रंगीत चिरोटे (तीन प्रकार), गुलकंद लाडू, पान लाडू या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी कार्यशाळेत शिकविल्या जाणार आहेत. पंचवीस वर्षांचा पाककलेतील अनुभव असलेल्या अपर्णा पेंडुरकर या मार्गदर्शन करणार आहेत. अरिीपर झशपर्वीीज्ञरी हे त्यांचे यूट्यूब चॅनेल आहे. त्यावर त्यांच्या खास रेसिपी बघायला मिळतील. दरम्यान, सभासदांना प्रवेश मोफत आहे. इतर महिलांसाठी फी रुपये 300 आहे. तर कार्यशाळेसाठी आधी नावनोंदणी आवश्यक आहे.

दि. 15 ऑक्टोबर ही सभासद नोंदणीची मुदत आहे. कस्तुरी सभासद व्हा आणि मिळवा बॉस कंपनीचा स्टील कोटेड थर्मास व विविध कार्यक्रमांचा आनंद लुटा. नोंदणी फी रु. 600 मात्र आहे. संपर्क : पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली – मिरज रोड, सांगली. मोबा : 9607957576

Back to top button