सांगली : स्वच्छता अभियानात विट्याची पुन्हा बाजी | पुढारी

सांगली : स्वच्छता अभियानात विट्याची पुन्हा बाजी

विटा; पुढारी वृत्तसेवा : स्वच्छता अभियानामध्ये विटा शहराने आपली दैदीप्यमान कामगिरी सुरूच ठेवली आहे. यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विट्याने देशभरातील एक लाखाहून कमी लोकसंख्येत असलेल्या शहरात सहावा तर पश्चिम विभागात आणि राज्यांत दुसरा क्रमांक पटकावला आहे. देशभरातील स्वच्छ सर्वेक्षण २०२२ चे गुणांकन आज शनिवारी सायंकाळी जाहीर झाले आहेत. यामध्ये एक लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या देशभरातील ३१० हून अधिक शहरांमध्ये विटा शहराने एकूण सहा हजार गुणांपैकी तब्बल ५ हजार ७७२.५५ गुण मिळवून देशात सहावा तर पश्चिम विभाग आणि राज्यांमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.

यावर्षी एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या पश्चिम विभागात एकूण ३१० तर राज्यातील ११५ शहरे सहभागी झालेली होती. चालू वर्षी सेवा पातळीवरील गुणांकनामध्ये ६०० पैकी पहिल्या तिमाहीमध्ये ३३६.४३ आणि दुसऱ्या तिमाहीत ४४८.८६ तसेच तिसऱ्या तिमाहीत एकूण १८०० पैकी १७०८.७४ गुण विटा शहराने मिळविले आहेत. यावर्षीही स्वच्छता अभियानामध्ये विटेकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याचे सर्वेक्षणाच्या निकालावरून स्पष्ट होत आहे.

शिवाय यावर्षीच्या स्वच्छता अभियानामध्येही नागरिकांचा अभिप्राय, लोकसहभाग, लोकांचा अनुभव आणि स्वच्छता ऍपचा वापर या सग ळ्यांच गुणांकनामध्ये विटा शहराने चमकदार कामगिरी केली आहे. दरम्यान यावर्षी महाराष्ट्रा तील पाचगणी, कराड,लोणावळा,कर्जत या शहरांनीही स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये विशेष कामगिरी केली आहे. दरम्यान, या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मावळते नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तसेच सर्व सदस्य, मुख्याधिकारी, प्रशासन आणि सर्व विटेकरांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button