Dravid on Bumrah : बुमराहबाबत द्रविड यांचे मोठे विधान म्हणाला, "ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या..." | पुढारी

Dravid on Bumrah : बुमराहबाबत द्रविड यांचे मोठे विधान म्हणाला, "ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या..."

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्‍ट्रेलियात हाेणार्‍या टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी टीम इंडिया सज्‍ज झाली आहे. मात्र या स्‍पर्धेपूर्वी भारताचा  वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्‍त असल्‍याने स्‍पर्धेतून बाहेर पडला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहच्या T20 विश्वचषकातील उपलब्धतेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ( Dravid on Bumrah )

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठदुखीच्या गंभीर समस्येमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून आणि टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला. ‘एनसीए’मध्ये ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. यावर राहुल द्रविड म्‍हणाले की, “जोपर्यंत बुमराह अधिकृतपणे वर्ल्डकपमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या त्याच्या आशा अबाधित आहेत.” ( Dravid on Bumrah )

दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी सांगितले की, बुमराह अद्याप विश्वचषकातून बाहेर गेलेला नाही, पुढे काय होते ते पाहू. बुमराह ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही याचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेतला जाऊ शकतो.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्‍यांच्‍यानंतर राहुल द्रविड यांनी बुमराहबाबत केलेल्‍या विधानामुळे त्‍याच्‍या चाहत्‍यांना दिलासा मिळाला आहे. आता बुमराह ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही याचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेतला जाऊ शकतो. या निर्णयाकडे देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा;

Back to top button