सांगली : वृद्ध आईला बेघर निवारा; केंद्रासमोर टाकून तरूणाचे पलायन | पुढारी

सांगली : वृद्ध आईला बेघर निवारा; केंद्रासमोर टाकून तरूणाचे पलायन

सांगली : पुढारी वृत्तसेवा : वृद्ध आईला बेघर निवारा केंद्रासमोरील फूटपाथवर टाकून तरुणाने पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तत्पुर्वी या वृद्ध महिलेला मारहाणही झाली होती. इन्साफ फौडेंशनचे अध्यक्ष मुस्तफा मुजावर यांनी वृद्ध महिलेला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

सांगलीत आपटा पोलिस चौकीच्या पश्चिमेला निराधारांसाठी सावली बेघर निवारा केंद्र सुरू आहे. गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने रिक्षातून वृद्ध आईला आणून बेघर निवारा केंद्राच्या दारात समोरील फूटपाथवर टाकले. संबंधित तरूण व रिक्षाचालकाने लगेचच तेथून पोबारा केला. बेघर निवारा केंद्र इन्साफ फौंडेशनमार्फत चालवले जाते. या फौंडेशनचे अध्यक्ष मुस्तफा मुजावर यांना हा प्रकार समजताच ते घटनास्थळी पोहोचले. वृद्धेच्या चेहर्‍यावर तसेच पाठीवर मारहाण झाल्याच्या खुणा दिसत होत्या. प्रकृतीही व्यवस्थित नव्हती. त्यामुळे मुजावर यांनी तातडीने या वृद्ध महिलेला सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वृद्ध महिलेवर उपचार सुरू आहेत.

Back to top button