सांगली : दत्त मंदिरातील दान पेटी फोडून 10 हजारांची चोरी | पुढारी

सांगली : दत्त मंदिरातील दान पेटी फोडून 10 हजारांची चोरी

कडेगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील दत्त मंदीरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण 10 हजार रुपये लंपास केल्याची घटना  घटना शनिवारी (दि.17) रात्री घडली. याबाबत विश्वास हणमंतराव व्यास (रा.कडेगाव) यांनी कडेगाव पोलीसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कडेगावात कोतमाई ओढ्यानजीक दत्त मंदिर आहे. शनिवारी (दि.17)रात्री अज्ञात चोरट्यांनी दत्त मंदिराच्या दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडले व मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला.

त्यानंतर दान पेटी ही मंदीराच्या गाभाऱ्यात आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कुलूप तुटले नाही. त्यामुळे चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला व येथील दानपेटी फोडली. या दानपेटीत भाविकांनी दान केलेले नोटा व नाणी अशी एकुण 10 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार दर्शनासाठी आलेल्या भक्तांना समजताच त्यांनी कडेगांव पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांना चोरीची माहिती दिली. या घटनेची कडेगाव पोलीसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी हे करीत आहेत.

हेही वाचलंत का?

 

Back to top button