IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ खेळाडू बाहेर बसण्याची शक्यता | पुढारी

IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ खेळाडू बाहेर बसण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS T20 : टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला T20 सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. या सामन्यात प्लेइंग-11 काय असेल हे सर्वात मोठे संकट आहे, कारण दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जडेजा आधीच संघातून बाहेर झाला आहे. आणि तो या मालिकेचा भाग नसेल. तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मालिकेपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत तोही मालिकेतून पूर्णपणे बाहेर आहे. त्यामुळे आता मोहालीत होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये कुणा-कुणाचा सहभाग असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. T20 विश्वचषकापूर्वी, टीम इंडिया तयारी कशी करतो हे पाहण्याची शेवटची संधी आहे. कर्णधार रोहित शर्माने आधीच सांगितले आहे की प्रयोग आणि तयारीची वेळ संपली आहे, आता सर्व योजना अंमलात आणण्याची आम्ही सज्ज झालो आहे.

उमेश यादवला स्थान मिळणे कठीण

मोहम्मद शमीच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या उमेश यादवला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळवणे कठीण जाईल. कारण टीम इंडिया केवळ चार गोलंदाजांसह मैदानात उतरताना दिसत आहे, याशिवाय अष्टपैलू खेळाडूही संघात सामील होतील. दुसरीकडे मात्र, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कुणाला स्थान द्यायचे यावर विचारमंथन होणार आहे. पंतच्या आशिया कप स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळणे अवघड असल्याची चर्चा आहे. पण डावखुरा फलंदाज म्हणून त्याचा पुन्हा संधी मिळू शकते. कर्णधार रोहित शर्मा 7+4 फॉर्म्युला वापरत पुढे जातो की 6+5 फॉर्म्युला स्वीकारतो यावर बरेच काही अवलंबून असेल. कारण सात फलंदाज खेळले तर हार्दिक पांड्याला पूर्ण वेळ गोलंदाजाची भूमिका पार पाडत चार षटके टाकावी लागतील. (IND vs AUS T20)

पहिल्या T20 साठी अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 (IND vs AUS T20)

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल

ऑस्ट्रेलियाचा संघ : शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह

भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिका (IND vs AUS T20)

पहिला सामना : 20 सप्टेंबर, मोहाली
दुसरा सामना : 23 सप्टेंबर, नागपूर
तिसरा सामना : 25 सप्टेंबर, हैदराबाद

Back to top button