सांगली : जत पूर्वमध्ये घोणस अळीचा फैलाव | पुढारी

सांगली : जत पूर्वमध्ये घोणस अळीचा फैलाव

जत; पुढारी वृत्तसेवा :  जत तालुक्याच्या पूर्वभागातील येळवी, खैराव, माडग्याळ या परिसरात घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण आहे. नुकतेच खैराव व येळवी व शेजारील सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील व्यक्तींना घोणस अळीने चावा घेतला आहे. तिघांची प्रकृती स्थिर आहे.  शेतकर्‍यांनी घोणस अळीच्या संदर्भात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

या घोणस अळीने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. अळीच्या चाव्याने अर्धे अंग पूर्ण बधिर होत आहे. ही अळी प्रामुख्याने उसाच्या फडात, गवत व मका पिकावर जास्त प्रमाणात आढळून येत आहे. तिचे शास्त्रीय नाव स्लग कॅटरपिल्लर असे आहे. ही अळी विषारी आहे. तसेच ती धारदार ब्लेड सारखे काटेरी असते. रंगाने पिवळी व हिरवी आहे. अळीच्या अंगावर कडक काटे असतात. यामुळे शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button