सांगली: कल्ले मच्छिंद्रगडावर जाणार्‍या रस्त्यावर कोसळल्या दरडी | पुढारी

सांगली: कल्ले मच्छिंद्रगडावर जाणार्‍या रस्त्यावर कोसळल्या दरडी

बहे; पुढारी वृत्तसेवा: वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड गडावर जाणार्‍या रस्त्यावर पावसाने अनेक ठिकाणी दरडी ढासळल्याने येथील वाहतूक बंद आहे. प्रशासनाने याची पाहणी करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

कि.म. गडावर श्री मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे. या मंदिराला पौराणिक महत्त्व आहे. परिसरातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. गडाच्या पश्चिम बाजूस मंदिरापर्यंत जाण्यासाठी सिमेंट काँक्रिटच्या रस्ता आहे.
या रस्त्यावरून गडावरती चार चाकी वाहने जातात.

पावसाळ्यात गडावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.पावसामुळे रस्त्यालगत असणार्‍या मोठमोठ्या दगडांना भेगा पडलेल्या आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे या दगडांचा वाहनांना अडथळा होत आहे. ग्रामपंचायतीने व प्रशासनाने याची पाहणी करून येथील दगड बाजूला करून रस्ता खुला करावा, अशी ग्रामस्थांनी मागणी आहे.

Back to top button