सांगली : सुर्यगाव येथील बुडालेल्या तरुणाला शोधण्यात २० तासानंतर यश | पुढारी

सांगली : सुर्यगाव येथील बुडालेल्या तरुणाला शोधण्यात २० तासानंतर यश

पलूस, पुढारी वृत्तसेवा : सुर्यगाव येथील सागर महादेव सुर्यवंशी (वय ३६) हा तरूण शुक्रवारी (दि.१५) कृष्णा नदीकाठी पोहताना दम लागून बुडाला होता. शुक्रवार पासून युध्द पातळीवर शोध मोहीम सुरू होती. शनिवारी सकाळी सांगलीच्या आयुष भारत टीम व भारती विद्यापीठ यांच्या बोटीच्या सहाय्याने २० तासानंतर सागरचा मृत्यदेह शोधण्यात यश‌ आले.

सुर्यगाव येथे कृष्णा नदीत बुर्लीच्या बाजूला सागर सुर्यवंशी हा तरूण पोहत आला. मात्र पोहत तो नदीकाठापासून वीस तीस फुट अंतरावर गेला असतानाच दम लागून तो बुडाला. ही बाब सुर्यगावच्या काठावरुन पाहणाऱ्या तरूणांच्या लक्षात आली. त्‍यानंतर लगेच काही तरूणांनी पाण्यात उड्या टाकून वाचवण्यासाठी धाव घेतली.

दरम्‍यान, बुर्लीच्या काठापर्यंत पोहचेपर्यंत सागर बुडाला होता. तरूणांनी बराच वेळ शोध घेऊनही तो सापडला नव्हता. यानंतर आमणापूर ग्रामपंचायतीच्या बोटीसह भारती रेस्क्यू टिम घटनास्थळी दाखल झाले होते. ही शोधमोहीम शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती.
तसेच, तर शनिवारी सकाळी आयुष भारत व भारती रेक्यू टीमने शोध घेतला. सागर ज्या ठिकाणी बुडाला होता तेथून काहीच अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. सकाळी नऊ वाजता रेस्क्यू टिमला हा मृतदेह शोधण्यात यश आले, अशी माहिती जीवरक्षक गजानन नरळे यांनी सांगितले.

हेही वाचा  

Back to top button