जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी पनवेलकर सज्ज | पुढारी

जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी पनवेलकर सज्ज

पनवेल; विक्रम बाबर : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखल मराठा बांधवाने आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलक आज पनवेल येथून मुंबईकडे जाणार आहेत. सकाळी लोणावळावरून हे आंदोलक जुन्या पुणे–मुंबई महामार्गावरून पळंस्पे फाटा ते वहाळ नंतर बेलापूर अशा मार्गाने हा मोर्चा आज वाशी येथे मुक्कामाला जाणार आहे.

या आंदोलनाचे स्वागत पनवेल येथील करंजाडे वसाहतीमधे करण्यात येणार आहे. या अंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. कामोठ्यात जवळपास लाखो भाकऱ्या, चपात्या, भात, पीठलं तसेच ठेचा मोठ्या प्रमाणत बनवला आहे. काल रात्रीपासूनच या नियोजनाची सर्वत्र तयारी सुरू आहे. कामोठे, खांदा कॉलनी, पनवेल येथे ही व्यवस्‍था करण्यात आली आहे. कामोठे सेक्टर ३६, सेक्टर १८ आणि सेक्टर ६ मध्ये जेवण बनण्यात येत आहे. या ठिकाणी पुलाव बनवून ते पॅकिज करून आंदोलकांसाठी तयार करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा स्वयंसेवक एकत्र आले आहेत. मराठा बांधवांकडून करण्यात आलेल्या आव्हानानुसार प्रत्येक घरातून चपाती, भाकरी आणि भाजी देण्यासाठी मराठा बांधवांनी गर्दी केली आहे. जवळपास लाखो आंदोलकांच्या जेवणासाठी तयारी झाली आहे.

Back to top button