रायगड: महाड परिसराला पावसाने झोडपले, दिवाळीच्या खरेदीवर विरजण | पुढारी

रायगड: महाड परिसराला पावसाने झोडपले, दिवाळीच्या खरेदीवर विरजण

महाड, पुढारी वृत्तसेवा: महाड शहरासह ग्रामीण भागाला आज (दि.८) दुपारी पावणे दोनच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. महाड शहर एमआयडीसी परिसरात अचानक आलेल्या पावसाने दिवाळी सणाच्या खरेदीवर विरजण घातले. फटाके खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. तर दुकानदारांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.  Raigad heavy rain

सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारी बाराच्या सुमारास बिरवाडी परिसरात अंधारून येऊ लागले. त्यानंतर सोसाट्याचे वारेही वाहून लागले. काही वेळातच जोरदार पावसाने हजेरी लावली. सखल भागात पाणी साचले. महाड शहरासह परिसरात बराच वेळ पावसाची रिपरीप सुरूच होती. विक्रेत्यांची फटाक्यांची सावरासावर करताना चांगलीच तारांबळ उडाली. Raigad heavy rain

हेही वाचा 

Back to top button