रायगड : रोहा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर खासदार सुनील तटकरे यांचे वर्चस्व | पुढारी

रायगड : रोहा तालुक्यातील ग्रामपंचायतींवर खासदार सुनील तटकरे यांचे वर्चस्व

रोहे; पुढारी वृत्तसेवा : रोहा तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांचा करिष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आले. ना.आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आ. महेंद्र दळवी सातत्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष देत असल्याने रोहा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली असून बहुतांशी ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाने प्रवेश केला आहे. तालुक्यातील सगळ्यात महत्त्वाचे असलेल्या नागोठणे ग्रामपंचायतमध्ये इंडिया आघाडीने यश संपादन केले आहे. तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने ही चांगले यश काही ग्रामपंचायतीमध्ये संपादन केले आहे. तर काही ग्रामपंचायत मध्ये भाजपने ही प्रवेश केला आहे.

रोहा तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये काही अपवाद सोडल्यास वेगवेगळ्या स्थानिक आघाड्या दिसून आल्या. काही ठिकाणी इंडिया आघाडी, काही ठिकाणी स्थानिक विकास आघाडी, महाविकास आघाडी दिसून आली.

रोहा तालुक्यात सुनील तटकरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा करिष्मा कायम असल्याचे १२ ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दिसून आले. या १२ ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला आहे. यास उर्वरित सरपंच पदाच्या निकालामध्ये स्थानिक विकास आघाडीचा २, शेतकरी कामगार पक्ष १, शिवसेना शिंदे गट १, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे १ सरपंच पदाचा उमेदवार विजयी झाला आहे.

रोहा तालुक्यात १२ ग्रामपंचायत साठी व १ पोटनिवडणुकीसाठी काल रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी रोहा तहसिल कार्यालयाच्या आवारात या १२ ग्रामपंचायतीचे तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होऊन १२.३० मतमोजणी पुर्ण झाली.

मतमोजणीच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती पोलिसांचा चौक बंदोबस्त होता. उमेदवार विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पहावयास मिळाला.

रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रोहा तालुकाकडे लागले होते. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष फुटी नंतर पहिलीच ग्रामस्तरावरची निवडणूक होती. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण विजयी होईल याची उत्सुकता सगळयांना लागली होती.

सोमवारी सरपंचपदाच्या उमेदवाराचा निकाल मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटांचे खारगाव ग्रामपंचायत दत्तात्रेय चिमाजी काळे, कोकबन तेजस्विनी तुषार वाजंत्री, येरळ ग्रामपंचायत जाधव सुरेश गंगाराम, तांबडी ग्रामपंचायत परशुराम धोंडू पवार, न्हावे ग्रामपंचायत डबीर नितीन, भातसई ग्रामपंचायत

योगिता नामदेव पारधी, खांबेरे ग्रामपंचायत अतिष मोरे हे विजयी झाले आहेत.यासह अन्य सरपंच पदाच्या निकालात नागोठणे ग्रामपंचायत सुप्रिया संजय महाडिक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, चणेरा ग्रामपंचायत राजेंद्र मनोहर इंदुलकर शिवसेना शिंदे गट, विरजोली प्रदीप जगन्नाथ कुंडे स्थानिक विकास आघाडी, सानेगाव ग्रामपंचायत निर्मला नारायण वाघमारे स्थानिक विकास आघाडी, आरे बुद्रुक ग्रामपंचायत राजेंद्र एकनाथ मळेकर शेतकरी कामगार पक्ष हे उमेदवार विजयी झाले आहेत.

रोहा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या सदस्य पदाच्या विजयी उमेदवारांमध्ये तांबडी ग्रामपंचायत सर्वच सर्व राष्ट्रवादी ९, खांबेरे महाविकास आघाडी ३, शेकाप ३, अपक्ष ३, चणेरा राष्ट्रवादी ३, शिंदे १, अपक्ष १, न्हावे राष्ट्रवादी ३, उबाठा १, शेकाप १, भाजप १, रिक्त ३, भातसई राष्ट्रवादी ५, शिंदे गट ४ सानेगाव स्थानिक विकास आघाडी ८, राष्ट्रवादी १, कोकबन राष्ट्रवादी ५, शेकाप १, शिंदे गट १,आरे बुद्रुक शेकाप ५, शिंदे गट २, नागोठणे इंडिया आघाडी १६, राष्ट्रवादी १, येरळ राष्ट्रवादी ४, अपक्ष ३, खारगांव राष्ट्रवादी ८, शिंदे गट ३, विरजोली स्थानिक विकास आघाडीची सत्ता आली आहे.

Back to top button