रायगड : कॅनलमध्ये कार पलटी होऊन दोनजण जखमी | पुढारी

रायगड : कॅनलमध्ये कार पलटी होऊन दोनजण जखमी

पोलादपूर, पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-गोवा महामार्ग वरील पोलादपूर ग्रामीण रुग्णालय जवळ उमिया स्टीलच्या बाजूला असणाऱ्या गटार मध्ये चारचाकी कार पलटी झाल्याने या अपघातात २ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.१८) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. स्वप्निल सावंत (वय २९) आणि सुमित मोरे (१८, दोघेही रा. पळचील जलाचीवाडी) असे जखमी झालेल्या दोघांचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलादपूर बाजू कडून हुंडाई कंपनीची कार मुंबईकडे जात असताना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ उमया स्टील जवळ आली. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरची कार महामार्ग लगत असणाऱ्या गटारमध्ये पलटी झाल्याने कार मधील दोघे जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळातच घटनास्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पीएसआय धुमासकर, पोलीस हवालदार कदम, पोना मोरे , ठाणे अमलदार पोना. घुले, पोलीस अंमलदार बनसोडे, पोलीस हवालदार शिंगणकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन दोघे जखमी तरुणांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button