रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २५ धरणे शंभर टक्के भरली | पुढारी

रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २५ धरणे शंभर टक्के भरली

महादेव सरसंबे

रोहे, यावर्षी रायगड जिल्ह्यात पावसाला उशिराने सुरूवात झाली. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत येत असलेल्या २८ धरणांपैकी २५ पंचवीस धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित तीन धरणे ही भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झालेला आहे. जिल्ह्यातील २५ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.

रायगड जिल्ह्यातील २५ धारणे भरले असून तीन धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत त्या तीन धरणांमध्ये अलिबाग येथील श्रीगाव धरण क्षेत्रात ९४ टक्के पाणीसाठा, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात ७४ टक्के पाणीसाठा, तर उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील धरणामध्ये पाणीसाठा

मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, अलिबाग तालुक्यातील श्रीगाव धरण क्षेत्रात ९४ टक्के पाणीसाठा, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, घोटवडे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, ढोकशेत धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, कवेळे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, उन्हेरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ७४ टक्के पाणीसाठा, कुडकी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, रानीवली धरण क्षेत्रात ७३ टक्के पाणीसाठा, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, संदेरी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, महाड तालुक्यातील वरंध धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, खिंडवाडी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा,

कोथुर्डे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, खैरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, अवसरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, खालापूर तालुक्यातील भिलवले धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, कलोते मोकाशी धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, डोणवत धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, बामणोली धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, उसरण धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा, उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ८१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

हेही वाचा 

Back to top button