file photo
file photo

रायगड : चिरेखिडजवळ कार अपघात ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

Published on

पोलादपूर, पुढारी वृत्तसेवा :  महामार्ग प्रमाणे राज्य मार्गवर अपघाताचे सत्र सुरु आहे, पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरुर राज्य मार्गवर सोमवारी एका कारच्या झालेल्या अपघातात ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरच्या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दाखल करण्यात आली आहे

याबाबत अधिकची माहिती अशी की, आरोपी महादेव मारुती बिजें  (वय ५९, प्रभात कॉलनी महाड ता. महाड जि.रायगड) हा त्याची  नेक्सन कार महाड येथून कोल्हापूर येथे जात होता. यावेळी त्याची कार पोलादपूरच्या चिरेखिंड गावच्या आली असता गाडी पलटी झाली. सदर अपघातात सुरेखा व महादेव सह ८० वर्षीय तानुबाई बिर्जे ह्या जखमी झाल्या.

या पैकी फिर्यादी सुरेखा याच्या सासु तानुबाई यांना जास्त मार लागल्याने उपचारसाठी महाडकडे नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी सपोनि श्री युवराज म्हसकर , पोह कोंडाळकर पोलादपुर पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिणीद्वारे दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news