रायगड : पनवेलच्या माजी उपमहापौरांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला | पुढारी

रायगड : पनवेलच्या माजी उपमहापौरांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि RPI पक्षाचे (आठवले गट) कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या कळबोली (पनवेल) येथील राहत्या घरावर हल्ला केला. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकित माजी उपमहापौरांच्या घराचे नुकसान झाले आहे. तसेच अज्ञातांनी घराशेजारी उभ्या करण्यात आलेल्या गाड्यादेखील फोडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील २५ ते ३० अज्ञातांनी माजी महापौर जगदीश गायकवाड यांच्या घरावर हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अज्ञातांनी गाड्यामधील महत्वाचे पेपर आणि दीड लाख रुपये रोख रक्कम चोरल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात भादवी कलम 395,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याची परिसरात चर्चा आहे.

हेही वाचा:

Back to top button