राज्यपालांनी पदमुक्तीची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा; राजभवनातून मात्र इन्कार | पुढारी

राज्यपालांनी पदमुक्तीची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा; राजभवनातून मात्र इन्कार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चहूबाजूंनी होणारी टीका विचारात घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. मात्र, राजभवनातून त्याचा इन्कार करण्यात आला.

राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले होते. मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्यानंतर तीव— पडसाद उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे केली आहे. खा. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. अशातच आपल्याला राज्यपालपदावरून पदमुक्त व्हायचे आहे, अशी इच्छा राज्यपालांनी व्यक्त केल्याची अफवा मंत्रालयात पसरली होती.

Back to top button