बिग बॉस मराठी-4 मध्ये राखी सावंतची एन्ट्री | पुढारी

बिग बॉस मराठी-4 मध्ये राखी सावंतची एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बिग बॉस मराठीच्या घरात Entertainment Queen म्हणजेच राखी सावंतची एन्ट्री झालीय. घरात जाताच तेजस्विनी आणि राखीमध्ये वादाची ठिणगी पडली. रहिवासी संघ बोर्डवर १ नंबरवर कोणाच्या नावाची पाटी लागणार ? यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला.

तेजस्विनी म्हणाली, राखी मॅडम माझा आहे तो… राखी म्हणाली बरोबर आहे तो … तेजस्विनी म्हणाली, मी माझ्या एक नंबरवर पाटी लावणार … राखी म्हणाली मी आता लावलेलं आहे … तेजस्विनी म्हणाली असं थोडी आहे माझं आधी होत… राखी म्हणाली मग मी तुझं तोडणार… तेजस्विनी म्हणाली मग मी तुमचं पण तोडणार … यावर राखी म्हणाली, तोड… आता तुझा एक हात तुटला आहे… दुसरा तुटेल…

Back to top button