पिंपरी : प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात | पुढारी

पिंपरी : प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

‘पेन ड्राईव्ह’ सोमवारी निवडणूक आयोगाकडे सादर करणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभागरचनेचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.

प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा असलेला ‘पेन ड्राईव्ह’ सोमवारी (दि.6) राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.3) स्पष्ट केले.

महापालिकेच्या 25 अधिकार्‍यांच्या समितीमार्फत जीएसआय (जिऑग्रॉफीक इन्फॉर्मेशन सिस्टिम) प्रणालीद्वारे प्रभागरचना करण्याचे काम सुरू आहे.

बीड : जि. प. शाळेतील शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्‍न

एकूण 139 जागांसाठी एकूण 46 प्रभाग होणार आहेत. त्यात 1 प्रभाग 4 सदस्यांचा असणार आहे. सन 2011 च्या 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्येनुसार शहरात एकूण 3 हजार 102 प्रगण गट (ब्लॉक) आहेत. त्यानुसार प्रभागरचना केली जात आहे. एका प्रभागात सरासरी 37 हजार लोकसंख्या असणार आहे.

नैसर्गिक सीमा कायम ठेऊन व लोकसंख्येचे गट न फोडता रचना केली जात आहे. सन 2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार काम सुरू आहे. एकूण 11 नगरसेवक वाढणार आहेत.

वानखेडेवर अश्विनचा ‘गोंधळ’, BOLD झाला तरी DRS मागत राहिला (Video)

प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करून तो 30 नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने
3 नोव्हेंबरला पालिकेस दिले होते.

मात्र, पुणे महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड पालिकेने या कामासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सेक्स की फूड : अभिनेत्री सामंथाने दिले ‘क्लिन बोल्ड’ करणारे उत्तर

आयोगाने 5 दिवसांची मुदत देऊन सोमवार (दि. 6) पर्यंत आराखडा सादर करण्याचे आदेश 29 नोव्हेंबरला दिले होते. त्यानुसार पालिकेकडून कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.

आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 4) आराखड्यास अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि.6) आराखडा असलेला पेन ड्राईव्ह सील करून मुंबईतील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.

इलियाना डिक्रूजचा न्यूड फोटो व्हायरल, म्हणते – Do Not Disturb

आयुक्तांच्या मंजुरीनंतर आराखडा सादर करणार

प्रभागरचनेचा प्रारूप आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनशाखाली शनिवारी (दि.4) आराखडा मंजुर केला जाईल.

त्यांच्या सुचनेनुसार काही बदल केले जातील. त्यांच्या सहमतीनंतर सोमवारी (दि.6) आराखडा राज्य निवडणूक आयोगास पाठविला जाईल किंवा गरज पडल्यास आणखी वेळ मागून घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

Back to top button